MUMBAI RAINS LIVE : तीनही मार्गावरील लोकल वाहतूक धीम्या गतीने

मुंबई आणि उपनगरांत झालेल्या पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.  

Updated: Jul 21, 2015, 11:37 AM IST
MUMBAI RAINS LIVE : तीनही मार्गावरील लोकल वाहतूक धीम्या गतीने title=

मुंबई : पश्चिम आणि सेट्र्ल रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली आहे, पाण्याचा जोर ओसरल्याने वाहतूक पूर्ववत होण्यास मदत होत आहे. पश्चिम रेल्वेला मात्र पालघरजवळ अडचणींचा सामना करावा लागतोय, कारण ट्रॅक खालील माती वाहून गेल्याने लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक सुरळीत करण्यास वेळ जाणार आहेत, दरम्यान सेंट्रल आणि मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या काही रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. 11.32 AM

मुंबईत अंधेरी-वांद्रे दरम्यान पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प सुरळीत होतेय, तर दुसरीकडे सेंट्र्ल रेल्वेला ही अडचणींचा सामना करावा लागतोय, सायन आणि कुर्ला दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणीसाचल्याने सेंट्रल रेल्वेची वाहतूक देखील कोलमडली आहे. 11.00 AM

वांद्रे ते चर्चगेट लोकल वाहतूक धीम्या गतीने सुरू 10.44 AM
वांद्रे स्टेशनवरील पाऊस ओसरण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे धीम्या गतीने काही लोकल फास्ट ट्रॅकवरून वांद्रेच्या दिशेने तर वांद्र्याहून काही लोकल दादरच्या दिशेने सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान वांद्रे ते बोरिवली दरम्यानची वाहतूक सुरू करण्यात आली आहे, पण ही वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

ठाण्याहून कसाऱ्याच्या दिशेची वाहतूक ठप्प 10.37 AM
बदलापूर, कल्याण भिवंडी परिसरात अंबरनाथजवळ ट्रॅकवर पाणी साचल्याने सेंट्रल रेल्वेला येथे देखील पावसाचा सामना करावा लागतोय, म्हणून या अंबरनाथजवळ सेंट्रल रेल्वेची वाहतूक रखडलीय.

हार्बर तर लगेच बोंबलली 10.20 AM
हार्बर रेल्वेची वाहतूक जीटीबी नगर  आणि वडाळा भागात ट्रॅकवर पाणी साचल्याने विस्कळीत झाली आहे. यामुळे चाकरमान्यांना घरूनच ऑफिसला उशीर होईल किंवा पोहचण्यासाची शक्यता कमी असल्याचा मेसेज द्यावा लागलाय.

मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात विक्रमी पाऊस 09.46 AM

बदलापूर, शहापूर, मुरबाळ परिसरात जोरदार पाऊस झाल्याने, मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी ही गूड न्यूज म्हणावी लागेल.

बोईसर-पालघर परिसरात विक्रमी पाऊस 09.35 AM

बोईसर आणि पालघर परिसरात २४ तासांत विक्रमी पाऊस झाला आहे, २४ तास ४४५ मिमी पाऊस नोंदवण्यात आला आहे, यामुळे पालघरच्या विविध भागात पाणी साचलंय. पालघरमधील शाळा कॉलेजना सुट्टी देण्यात आली आहे. बोईसर आणि पालघर दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या बाजूचा भराव वाहून गेला आहे, ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान दोन ते तीन तास लागणार आहेत.

अंधेरी ते चर्चगेट लोकल वाहतूक बंद 09.20 AM

मुंबई आणि उपनगरांत झालेल्या पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.  

अंधरी ते चर्चेगेटकडे येणारी वाहतूक सध्या तरी बंद करण्यात आली आहे. तर सेंट्र्ल रेल्वेची वाहतूक २५ मिनिटे उशीराने सुरू आहे.

वांद्रे स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेला मोठा फटका बसला आहे.

मुंबई शहरात आज पहाटेपासूनच पाऊस आहे. त्यामुळे आज सकाळपासून मुंबापुरीत सूर्यदर्शन न झाल्याने काळोख पसरला आहे.

http://zeenews.india.com/marathi/live

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.