पाहा, थोडक्यात हवामानाचा अंदाज (२४ नोव्हें.२०१५)

अरबी समुद्राच्या मध्य-पूर्व बाजूला कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. यातून निघालेली एक टफ रेषा दक्षिण गुजरातकडे जातेय, यामुळे मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 

Updated: Nov 24, 2015, 05:03 PM IST
पाहा, थोडक्यात हवामानाचा अंदाज (२४ नोव्हें.२०१५) title=

मुंबई : अरबी समुद्राच्या मध्य-पूर्व बाजूला कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. यातून निघालेली एक टफ रेषा दक्षिण गुजरातकडे जातेय, यामुळे मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 

(हवामानाची स्थिती पाहा बातमीच्या सर्वात खाली)

गुजरातला लागून असलेल्या जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे, पश्चिम मध्य प्रदेश तसेच दक्षिण गुजरातमध्येही पावसाची शक्यता आहे. 

राज्यात मागील आठवड्यापासून अनेक ठिकाणी बेमोसमी पाऊस झाला आहे, यात मुंबईसह उपनगरं, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, नाशिक या शहरांना तसेच जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसला आहे.

बेमोसमी पावसामुळे थंडी कमी झाली असली, तरी शेतीला या वातावरणाचा मोठा फटका बसला आहे. मुंबईतही आज दुपारनंतर ढगाळ वातावरण दिसून आलं आहे. 

हवामानाची स्थिती पाहा (सौजन्य - स्कायमेट)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.