पाहा, मुंबईत उद्या कोणकोणत्या भागांत होणार पाणीकपात...

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी भागात १४५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर झडप बसवण्याचं काम येत्या बुधवारी ५ ऑगस्ट रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळं बुधवारी आणि गुरूवारी एफ दक्षिण आणि एफ उत्तर या महापालिका विभागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. 

Updated: Aug 4, 2015, 10:32 AM IST
पाहा, मुंबईत उद्या कोणकोणत्या भागांत होणार पाणीकपात...  title=

मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे शिवडी भागात १४५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर झडप बसवण्याचं काम येत्या बुधवारी ५ ऑगस्ट रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळं बुधवारी आणि गुरूवारी एफ दक्षिण आणि एफ उत्तर या महापालिका विभागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. 

मध्य मुंबईत ही पाणीकपात होणार आहे. त्यामुळे एफ - दक्षिण, एफ - उत्तर विभागातील रहिवाशांना या पाणीकपातीचा फटका बसणार आहे. 

कोणत्या भागात पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे, ते पाहूयात...
पाणीपुरवठा बंद - सायन, माटुंगा, दादर पारशी वसाहत, हिंदू कॉलनी
पाणीपुरवठा बंद - दादर टीटी, कात्रक रोड, किडवाई मार्ग, सहकार नगर
पाणीपुरवठा बंद - कोरबा मिठागर, दादर, नायगाव, परळ, लालबाग, चिंचपोकळी
पाणीपुरवठा बंद - शिवडी, ज्ञानेश्वर नगर, टीबी हॉस्पिटल, अभ्युदय नगर
कमी पाणीपुरवठा - परळ व्हिलेज, आंबेवाडी, काळेवाडी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.