पोलिसांकडून जोडप्याला मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

पोलीस ठाण्यात पोलिसांकडून एका जोडप्याला बेदम मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Updated: May 23, 2016, 11:29 AM IST
पोलिसांकडून जोडप्याला मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : पोलीस ठाण्यात पोलिसांकडून एका जोडप्याला बेदम मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

या व्हिडीओत पोलीस एका जोडप्याला अत्यंत अमानुषपणे मारहाण करत असल्याचे दिसत आहे. 

रिपोर्टनुसार, हे जोडपे कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले होते. त्यावेळी पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला आणि त्यानंतर त्यांना मारहाण केली.