एअर इंडियाची स्वस्त विमान सफर

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टुरिस्ट कंपन्या किंवा विमान कंपन्यांकडून काही ना काही क्लृप्त्या लढवल्या जातात. तशीच एक ऑफर स्पाईस जेटनंतर आता एअर इंडियानंही ठेवलीय.  

Updated: May 22, 2016, 08:50 AM IST
एअर इंडियाची स्वस्त विमान सफर title=

मुंबई : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टुरिस्ट कंपन्या किंवा विमान कंपन्यांकडून काही ना काही क्लृप्त्या लढवल्या जातात. तशीच एक ऑफर स्पाईस जेटनंतर आता एअर इंडियानंही ठेवलीय.  

१४९९ रुपयांपासून एअर इंडियाचं विमान तिकीट उपलब्ध करण्यात आलंय. सुपर सेल या योजनेंतर्गत २१ मे ते २५ मे या पाच दिवसांत तुम्ही देशभरात एअर इंडियाच्या विमानानं प्रवास केल्यास तुम्हाला या सुपर सेलचा लाभ घेता येईल. 

जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्या अशा ऑफर सुट्यांच्या काळात सुरू करत असतात. जानेवारी ते मार्च आणि जुलै ते सप्टेंबर हा काळ विमान कंपन्यांसाठी मंदीचा काळ असतो.