मुंबईमध्ये जोरदार पावसाचा इशारा

 मुंबईत येत्या २४ तासात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या क्षेत्रीय सेंटरने अलर्ट दिला आहे. 

Updated: Jul 29, 2014, 04:45 PM IST
मुंबईमध्ये जोरदार पावसाचा इशारा title=

मुंबई :  मुंबईत येत्या २४ तासात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या क्षेत्रीय सेंटरने अलर्ट दिला आहे. 

येत्या २४ तासात मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकसह किनारपट्टीच्या भागात जोरदार पाऊस पडू शकतो. आयएमडी मुंबईचे संचालक व्ही. के. राजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार किनारपट्टीच्या भागात पावसाळी हवेसह मान्सूनचा प्रभाव राहणार आहे. 

राजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार २४ तासांत मुंबई आणि कोकण भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईत ७ सेंटीमीटरपेक्षाही अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाची रेंज ७ ते १४ सेंटिमीटरच्या आसपास असण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्हा आणि कोकण भाकात २४ सेंटीमीटरच्या आसपास पावसाची रेंज असण्याची शक्यता आहे. आयएमडी रेकॉर्डनुसार सांताक्रुझमध्ये गेल्या २४ तासात ४८.३ मिमी आणि कुलाबा येथे २६.६ मिमी पाऊस झाला. या दरम्यान ६ मोठ्या जलाशयापैकी  तुळसी तलावात पुरेसा पाणी उपलब्ध झाले आहे. 

गेल्या वर्षी १२ जुलै रोजी तुळशी तलाव भरला होता. मंगळवारच्या आकडेवारीनुसार सर्व सात तलावांमध्ये ४.९९ लाख मिलियन लीटर पाणी भरले आहे. हे पाणी पुढील ४ चार महिने पुरेल इतके आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.