आता मुंबईकरांचं जेवण महागणार!

मुंबईकरांचं जेवणही आता महाग होणार आहे.... कारण नाशिकहून मुंबईला येणा-या भाज्या प्रचंड महागल्यायत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 22, 2013, 07:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईकरांचं जेवणही आता महाग होणार आहे.... कारण नाशिकहून मुंबईला येणा-या भाज्या प्रचंड महागल्यायत. नाशिकच्या भाज्या आता दुष्काळी मराठवाड्यातही जाऊ लागल्यानं भाज्यांचे दर चांगलेच कडाडलेत.
मुंबईची परसबाग असलेल्या नाशिक जिल्ह्यात भाज्यांचे भाव चांगलेच वधारलेत. नाशिकमधून मुंबई आणि गुजरातकडे या भाज्या जातात. पण सध्या मराठवाड्यात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य असल्यानं मराठवाड्यात भाज्याच पिकत नाहीयत. त्यामुळे नाशिकच्या भाज्या मराठवाड्याला पुरवाव्या लागतायत. भाज्यांच्या मागणीत वाढ आणि पुरवठा कमी झाल्यानं भाज्यांचे दर कडाडलेत.
थेंब न थेंब पाऊस वाचवून नियोजन करणा-या शेतक-यांसाठी भाज्यांचे दर वाढल्यानं सुगीचे दिवस आहेत. पण पाऊस लवकर आला नाही, तर हे दर असेच वाढत जातील. त्यामुळे वरुणराजाचं लवकर आगमन होणं, हीच सध्याच्या घडीला मोठी गरज आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.