कार्टुन वादंगानंतर उद्धव ठाकरेंचा 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न

'सामना'तल्या व्यंगचित्राच्या वादानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Updated: Sep 28, 2016, 11:51 PM IST
कार्टुन वादंगानंतर उद्धव ठाकरेंचा 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न  title=

मुंबई : 'सामना'तल्या व्यंगचित्राच्या वादानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले आहेत.

मराठा आरक्षणासंदर्भात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्या म्हणजेच गुरुवारी भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत आरक्षणाबाबत चर्चा करणार आहेत. उद्धव ठाकरे गुरुवारी राज्यपालांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरेंची भूमिका...

सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तर मराठा समाजाचे प्रश्न सुटू शकतात अशी भूमिका युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मांडलीय. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसदर्भात एक विशेष अधिवेशन आयोजित करून त्यांचा आवाज ऐकणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. मुखपत्र सामनामधील व्यंगचित्रावरुन निर्माण करण्यात आलेला वाद हा राजकीय कारस्थान असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय.