उद्धव ठाकरे आज केडीएमसीत, भाजपला जाणीव करून देण्यासाठी शक्तिप्रदर्शन!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आज महापौर निवडणुकीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते कल्याणच्या दुर्गाडी मंदिरात देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर डोंबिवलीतील गणेश मंदिरात जातील. दरम्यान, जोरदार शक्तिप्रदर्शन करुन भाजपला शिवसेना जाणीव करुन देणार असल्याचे तयारीवरून दिसून येत आहे.

Updated: Nov 11, 2015, 10:24 AM IST
उद्धव ठाकरे आज केडीएमसीत, भाजपला जाणीव करून देण्यासाठी शक्तिप्रदर्शन! title=

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आज महापौर निवडणुकीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते कल्याणच्या दुर्गाडी मंदिरात देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर डोंबिवलीतील गणेश मंदिरात जातील. दरम्यान, जोरदार शक्तिप्रदर्शन करुन भाजपला शिवसेना जाणीव करुन देणार असल्याचे तयारीवरून दिसून येत आहे.

अधिक वाचा : केडीएमसी महापौर, उपमहापौर पदावर आज शिक्कामोर्तब

महापौर निवडीनंतर शिवसेनेना जोरदार शक्ति प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. तशी तयारी शिवसेनेने केली आहे. संपर्ण कार्यक्रमावर शिवसेनेची छाप पाडण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आलाय. ही भाजपसाठी मोठी चपराक असणार आहे. दरम्यान,  KDMC च्या कार्यक्रमात भाजपला दूर ठेवण्याची चालही खेळली गेली असल्याची चर्चा सुरु आहे.  

दरम्यान, केडीएमसीत शिवसेनेचा महापौर निवडून आल्यास मी स्वत: दुर्गाडी देवीच्या दर्शनाला येईन, असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान कल्याणकरांना दिला होता. त्याप्रमाणे आज महापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळी ते स्वत: जातीने उपस्थित राहणार आहेत. 

निकालानंतर नवनिर्वाचित महापौरांसोबत दुगार्डी येथे जाऊन दुर्गा देवीचे दर्शन घेणार आहेत. त्याचबरोबर ते डोंबिवलीतील अप्पा दातार चौकातील गणेशमंदिरात जाऊन गणपतीचेही दर्शन घेणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.