उर्वशीच्या अपघातानंतर भेटण्यासाठी उद्धव ठाकरे रूग्णालयात

 राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे यांच्या अपघातानंतर, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे स्वत: हिंदुजा रुग्णालयात पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे यांनी उर्वशीच्या तब्बेतीची विचारपूस केली आहे.

Updated: Nov 2, 2014, 09:50 PM IST
उर्वशीच्या अपघातानंतर भेटण्यासाठी उद्धव ठाकरे रूग्णालयात title=

मुंबई :  राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे यांच्या अपघातानंतर, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे स्वत: हिंदुजा रुग्णालयात पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे यांनी उर्वशीच्या तब्बेतीची विचारपूस केली आहे.

उर्वशी यांच्या तब्यतेची विचारपूस करण्यासाठी तिचे काका आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्नीसह रुग्णालयात पोहचले. जवळपास अर्धा तास उद्धव ठाकरे रुग्णालयात थांबले.

अपघातात उर्वशी यांच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाल्याचं कळतं आहे. संध्याकाळच्या सुमारास उर्वशी आपल्या मैत्रिणीसोबत दुचाकीवरुन जात असताना हा अपघात झाला.
 
राज ठाकरे यांनी  या घटनेनंतर आपले पुढील दोन दिवसांचे सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत. पराभवानंतर राज यांनी राज्यव्यापी दौरा सुरु केला होता. त्यानुसार ते उद्या डोंबिवली आणि परिसरात असणार होते. मात्र आता तो दौरा पुढं ढकलण्यात आला आहे.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.