मुंबई : शेवटच्या क्षणाला तरी शिवसेना-भाजप युती होणार का ? याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष राहिलंय.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये आज चर्चा होण्याची शक्यता आहे. आज रात्री दोघांची भेट होईल.
या बैठकीत युतीबाबत अंतिम बोलणी होण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र आजची भेट टळल्यास युती होण्याची शक्यता धुसर आहे.
दरम्यान, अशा प्रकारे कोणतीही भेट होणार नाही, याबाबत आम्हांला कोणतीही माहिती नाही, असे शिवसेना नेते अनिल देसाई यांनी पत्रकारांना सांगितले.