मुंबई : सायन रूग्णालयात काल रात्री एका महिलेने सयामी जुळ्यांना जन्म दिलाय. त्यांचे वजन साडेचार किलो इतके आहे.
सईन खान या मातेनं या बाळांना जन्म दिलाय. परंतु डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार यातील एकाच बाळाला वाचवणं शक्य होणार आहे. कारण या सयामी जुळ्यांना एकच ह्दय आहे.
तसंच फुफ्फुस, संडासची जागाही एकच असून दोनच किडन्या आहेत. श्वसननलिका दोन असल्या तरी पाय केवळ दोन आहेत. सयामी सर्व चिकित्सा सुरू असून त्याचे रिपोर्ट हातात आल्यानंतरच शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जाणाराय. यावेळी कुठल्या तरी एका बाळालाच डॉक्टरांना वाचवता येणाराय.