औरंगाबाद शस्त्र साठाप्रकरणी अबु जुंदलसह 12 जण दोषी

औरंगाबाद येथून हस्तगत करण्यात आलेल्या शस्त्र आणि स्फोटकांच्या साठय़ाप्रकरणी अबु जुंदलसह 12 जणांना दोषी ठरवण्यात आलंय. तर 8 आरोपींनी निर्दोष ठरवण्यात आलंय. तर एका आरोपी माफीचा साक्षीदार तर एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान सर्व आरोपींवरचा मोक्का कायदा हटवण्यात आलाय. 

Updated: Jul 28, 2016, 02:35 PM IST
औरंगाबाद शस्त्र साठाप्रकरणी अबु जुंदलसह 12 जण दोषी title=

मुंबई : औरंगाबाद येथून हस्तगत करण्यात आलेल्या शस्त्र आणि स्फोटकांच्या साठय़ाप्रकरणी अबु जुंदलसह 12 जणांना दोषी ठरवण्यात आलंय. तर 8 आरोपींनी निर्दोष ठरवण्यात आलंय. तर एका आरोपी माफीचा साक्षीदार तर एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान सर्व आरोपींवरचा मोक्का कायदा हटवण्यात आलाय. 

13 फेबुवारी २०१३ रोजी विविध कायद्याअंतर्गत आरोप निश्चित केले होते. त्यानंतर केली तीन वर्ष सुरु अबू जुंदालवर खटला सुरु होता. सुरक्षेच्या कारणास्तव कसाबच्या खटल्याकरता आर्थर रोड जेलमध्ये बांधण्यात आलेल्या विशेष कोर्टात हा खटला सुरु होता. विशेष मोक्का न्यायाधीश एस एल आनेकर यांच्या कोर्टात शुक्रवारी शिक्षा सुनावली जाणार आहे.