वीरमरण: अग्निशमन दलाच्या वीरांना अखेरचा सलाम!

आपलं कर्तव्य बजावत असतांना वीरमरण आलेले अग्निशमन दलाचे अधिकारी संजय वामन राणे आणि महेंद्र देसाई यांना अखेरचा सलाम देण्यात आलाय. काल रात्री

Updated: May 10, 2015, 02:58 PM IST
वीरमरण: अग्निशमन दलाच्या वीरांना अखेरचा सलाम! title=

मुंबई: आपलं कर्तव्य बजावत असतांना वीरमरण आलेले अग्निशमन दलाचे अधिकारी संजय वामन राणे आणि महेंद्र देसाई यांना अखेरचा सलाम देण्यात आलाय. काल रात्री

मुंबईतील काळबादेवी परिसरातील गोकुळ निवासमधील इमारत क्रमांक ३३ ला लागलेल्या भीषण आगीत या दोघांना वीरमरण आलं. 

बचावकार्य करत असताना अचानक इमारत कोसळल्यानं संजय राणे आणि महेंद्र देसाई हे दोन्ही अधिकारी आगीत सापडले.  संजय राणे हे अग्निशमन विभागामध्ये सहाय्यक विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते तर महेंद्र देसाई हे भायखळ्याच्या केंद्राचे प्रमुख होते.  

मध्यरात्री या दोघांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं. पण रुग्णालयात दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. या दोन्ही अधिकाऱ्यांना भायखळा अग्निशमनच्या मुख्य कार्यालयाबाहेर शेवटचा निरोप देण्यात आला.

दरम्यान,  या आगीत मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर आणि उपमुख्य अधिकारी सुधीर अमीन हे सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. नेसरीकर ४० टक्के तर अमीन हे ८० टक्के भाजले आहेत. सध्या त्यांच्यावर ऐरोलीतल्या बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.