हाजी अली दर्ग्यात प्रवेशाचा तृप्ती देसाईंचा इशारा

तृप्ती देसाई आता हाजी अली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशासाठी आंदोलन करणार आहेत. महिलांच्या मंदिर प्रवेशानंतर मशिदीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी तृप्ती देसाई आंदोलन करणार आहेत.

Updated: Apr 20, 2016, 07:09 PM IST
हाजी अली दर्ग्यात प्रवेशाचा तृप्ती देसाईंचा इशारा title=

मुंबई : तृप्ती देसाई आता हाजी अली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशासाठी आंदोलन करणार आहेत. महिलांच्या मंदिर प्रवेशानंतर मशिदीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी तृप्ती देसाई आंदोलन करणार आहेत. यासाठी 'हाजी अली सबके लिए' फोरमची स्थापना केली आहे. हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी ट्रस्टींसोबत चर्चा केली जाणार आहे.

तृप्ती देसाई पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या, 'जर महिलांना दर्ग्यामध्ये प्रवेश मिळाला नाही, तर २८ एप्रिल रोजी 'हाजी अली सबके लिए' फोरम धरणे आंदोलन करणार आहे.

शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर आणि कोल्हापूरच्या अंबाबाईनंतर मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी लढा सुरू केला आहे.