मालाडमध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू

मुंबईत काल संध्याकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. मालाडमध्ये काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे झाड कोसळून एकाचा मृत्यू झालाय. 

Updated: Jul 29, 2016, 12:03 PM IST
मालाडमध्ये झाड कोसळून एकाचा मृत्यू title=

मुंबई : मुंबईत काल संध्याकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. मालाडमध्ये काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे झाड कोसळून एकाचा मृत्यू झालाय. 

मालाडच्या आनंदनगर भागात ही घटना घडलीये. आनंदनगरमध्ये दोन गाड्यांवर झाड कोसळले. 

या अपघातात त्या गाडीतील ड्रायव्हर जागीच ठार झाला. तसेच एक रिक्षा आणि एका कारचं या घटनेत नुकसान झालंय.