राज्यातील वाहतूकदारांचा संप अखेर मागे

देशासह राज्यभरात आज वाहतुकदारांचा चक्काजाम सुरु होते. दरम्यान, राज्यात संपाला मिळालेला संमिश्र प्रतिसाद मिळाल्यामुळे वाहतूकदारांना आपला संप मागे घ्यावा लागला आहे. दरम्यान, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत वाहतूक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

Updated: Apr 30, 2015, 02:11 PM IST
राज्यातील वाहतूकदारांचा संप अखेर मागे title=

मुंबई - वाहतूकदारांचा संप अखेर मागे

रिक्षा, टॅक्सी चालकांसह बेस्ट-एसटी कामगारांचा आजचा संप मागे घेण्यात आलाय. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सकाळी संघटनांची बैठक बोलावली होती. रावतेंनी संपाच्याच दिवशी बैठक बोलावल्यानं काहीसा उशीर झाल्याची टीका झाली होती. मात्र अखेर या बैठकीत तोडगा निघालाय. 

संघटनांचा विरोध असलेला केंद्रातला प्रस्तावित कायदा राज्यात लागू करणार नसल्याचं आश्वासन रावते यांनी दिलं. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करू, असं रावते म्हणाले. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. 

राज्यातल्या मोठ्या शहरांमध्ये सकाळच्या वेळात या संपाचा फारसा फटका बसला नसला तरी ग्रामीण भागात त्याचा त्रास होण्याचा संभव होता... मात्र परिवहन मंत्र्यांच्या मध्यस्थीनं संप मागे घेण्यात आल्यानं नागरिकांचा जीव भांड्यात पडलाय.

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची बैठक
राज्यात संपाला मिळालेला संमिश्र प्रतिसाद मिळाल्यामुळे वाहतूकदारांना आपला संप मागे घ्यावा लागला आहे. दरम्यान, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत वाहतूक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

रस्ते वाहतूक सुरक्षा विधेयकाच्या विरोधात सार्वजनिक वाहतूक संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई, ठाण्यात रिक्षा व टॅक्सी चालकांनी बंदमध्ये सहभाग न घेतल्याने मुंबईतील प्रवाशांना दिलासा मिळाला. 

देशभरात सार्वजनिक उपक्रमातील परिवहन कामगारांनी एक दिवसांचा संप पुकारला असून हा संप यशस्वी करुन दाखवू, अशी घोषणा विविध कामगार संघटनांनी केली होती. मात्र प्रत्यक्षात या संपाला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र सकाळपासून दिसत आहे.

मुंबई - मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली या भागातील बस, टॅक्सी आणि रिक्षा सुरळीत सुरु असल्याचे दिसून आले.

- ठाण्यातील काही मार्गांवर धावणा-या एसटी गाड्यांची सेवा मात्र बंद असल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली.

पुणे - पुण्यातील रिक्षाचालकांनी संपात सहभाग घेतल्याने पुणेकरांचे हाल झालेत. एसटीच्या काही बसेस बंद असून पीएमपीएमएलचे कर्मचारी काळ्या फितू लावून आंदोलन करत आहेत.

सातारा - सातारा, सांगलीमध्ये संपाचा परिणाम नाही, बस व रिक्षा सुरु असल्याचे चित्र. 

औरंगाबाद - औरंगाबाद, धुळ्यात संपामुळे एसटी सेवा बंद, प्रवाशांचे हाल

नांदेड - एसटी बस सेवा सकाळपासून बंद तर नाशिकमध्येही संमिश्र प्रतिसाद

मुंबई - मुंबईतील ८२ टक्के बेस्ट बसेस रस्त्यावर, बेस्ट प्रशासनाचा दावा
वाहतूक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची मुंबईतील निवासस्थानी बैठक सुरु.

नागपूर - शहरात दोन ठिकाणी रिक्षावर दगडफेक
बंदला संमिश्र प्रतिसाद 

ठाणे - बंदला संमिश्र प्रतिसाद

गुहागर -  एस टी कामगारचे चक्का जाम आंदोलन
गुहागर - चिपळूण - खेड - दापोली येथील एस टी सेवा बंद 
बंदमुळे प्रवाशी वर्गाचे हाल

मुंबई - बंदला संमिश्र प्रतिसाद
मुंबई आणि उपनगरात टॅक्सी, रिक्षा काही ठिकाणी सुरु

मुंबई : देशासह राज्यभरात आज वाहतुकदारांचा चक्काजाम सुरु आहे. बेस्ट, टॅक्सी, रिक्षा बंद राहणार आहेत. सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होणार आहेत. मात्र, काही ठिकाणी रिक्षा, टॅक्सी सुरु होत्या. त्यामुळे सकाळी अनेकांना दिलासा मिळाला. तर काहींनी बसला प्राधान्य  दिल्याचे दिसत आहे.

केंद्र सरकारच्या रोड सेफ्टी विधेयकाविरोधात रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या सर्व  संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारलाय.  सकाळी मात्र या संपाचा फारसा परिणाम जाणवत नसला तरी दिवसभरात याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.. यात देशातले ४० लाख कामगार सहभागी होणार आहेत. दरम्यान मुंबई आणि उपनगर वगळता संपाचा परिणाम  जाणवत आहे. काही ठिकाणी एसटीची वाहतूक बंद आहे.

या संपात महाराष्ट्रातील ७ लाख रिक्षाचालक आणि १० हजार टॅक्सीचालकांसह बेस्टचे ४० हजार कर्मचारीही सहभागी होणार आहेत. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सकाळी नऊ वाजता बैठक बोलावली आहे.

बेस्टच्या कर्मचा-यांना  संपात सहभागी न होण्याचं आवाहन बेस्ट प्रशासनानं केलंय. याआधीच सुट्टी घेतलेल्या कर्मचा-यांव्यतिरीक्त इतर कर्मचा-यांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत...बेस्टचे कर्मचारी सहभागी होणार असले तरी बेस्ट सेवा सुरूच राहणार असल्याची माहिती बेस्टचे व्यवस्थापक जगदीश पाटील यांनी दिलीय.  

मात्र तरीही मुंबई, ठाण्यासह राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये आज वाहतुकीची समस्या उदभवणार असून प्रवाशांना अडचणींचा समाना करावा लागण्याची शक्यता आहे.  त्यामुळं गरज असेल तरच आणि लवकरात लवकर घराबाहेर पड़ावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.