मुंबईत खोदकामादरम्यान सापडल्या ट्रामच्या धावपट्ट्या

दक्षिण मुंबईतल्या हुतात्मा चौक भागात रस्त्याच्या खोदकामादरम्यान ट्रामच्या धावपट्ट्या सापडल्या. 

Updated: Feb 21, 2016, 08:22 AM IST
मुंबईत खोदकामादरम्यान सापडल्या  ट्रामच्या धावपट्ट्या  title=

मुंबई : दक्षिण मुंबईतल्या हुतात्मा चौक भागात रस्त्याच्या खोदकामादरम्यान ट्रामच्या धावपट्ट्या सापडल्या. 

मुंबई शहराची लोकसंख्या जसजशी वाढत गेली, तशी सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था कमी पडू लागली. व्हिक्टोरिया अर्थात घोडागाड्या ती गरज भागवू शकत नव्हत्या. त्यामुळे मुंबईत ट्राम या संकल्पनेचा जन्म झाला. 

मुंबईत १८७३ साली बॉम्बे ट्रामवे कंपनीची स्थापना झाली. ही ट्रामगाडी सुरुवातीला दोन मार्गांवर सुरू झाली. कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट, पायधुनी ते बोरीबंदर आणि बोरीबंदर ते काळबादेवी-पायधुनी या मार्गावर ट्राम धावू लागल्या. 

१९६४ मध्येच मुंबईतली ट्रामसेवा बंद केली गेली होती. दरम्यान खोदकामा दरम्यान सापडलेल्या ट्रामच्या धावपट्ट्यांमुळे, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.