मुंबई : यंदाच्या दिवाळीत मुंबईत फटाक्यांचा आवाज कमी होता.... गेल्या दहा वर्षांत फटाक्यांचा सगळ्यात कमी आवाज यंदाच्या दिवाळीत नोंदवण्यात आलाय.
मुंबईत रात्री दहा वाजेपर्यंतच फटाके उडवायला परवानगी होती, पण अनेक ठिकाणी ही बंदी झुगारत रात्रभर फटाके वाजवणं सुरू होतं. असं असलं तरी यंदाच्या वर्षी फटाक्यांच्या आवाजात लक्षणीय घट झालीय. मरीन ड्राईव्हला गेल्या वर्षी फटाक्यांचा आवाज 123.1 डेसिबल इतका होता.
यावर्षी मात्र मरीन ड्राईव्हवर हाच आवाज 113. 5 डेसिबल इतका नोंदवण्यात आला... विविध संस्थांनी प्रदूषणाबाबत केलेली जनजागृतीचा परिणाम यंदाच्या दिवाळीत दिसून आला. झी 24 तासनंही शाळाशाळांमध्ये जाऊन फटाके वाजवणार नाही, अशी शपथ विद्यार्थ्यांना दिली होती.
विद्यार्थ्यांनीही एक पाऊल पुढे टाकत साथ दिली आणि फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण काही प्रमाणात तरी कमी झालं.