विधीमंडळ कामकाज होणार पेपरलेस, सदस्यांना मिळणार टॅब

विधीमंडळाचं कामकाज पेपरलेस होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे. यावेळी विधान परिषद सदस्यांना टॅब दिले जाणार आहेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 2, 2017, 07:20 PM IST
विधीमंडळ कामकाज होणार पेपरलेस, सदस्यांना मिळणार टॅब title=

मुंबई : विधीमंडळाचं कामकाज पेपरलेस होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे. यावेळी विधान परिषद सदस्यांना टॅब दिले जाणार आहेत. 

टॅबच्या माध्यमातून परिषदेचं कामकाज होणार आहे. यामुळे विधानसभा आणि विधानपरिषदेचे संपूर्ण कामकाज विधीमंडळाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून पाहता येईल. 

6 मार्चपासून अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनासाठी आवश्यक असलेले प्रश्न, लक्षवेधी प्रश्न पाठवण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या गोष्टींमुळे आलेले प्रश्न पुन्हा लिहीणे, विभागानुसार संबंधितांना पाठवणे हा व्याप मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.