टॅक्सी आंदोलनाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड

ओला आणि उबेरला विरोध करण्यासाठी जय भगवान टॅक्सी महासंघाने आज आझाद मैदानात आंदोलनाचे आयोजन केले होते. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले. 

Updated: Jun 21, 2016, 03:48 PM IST
टॅक्सी आंदोलनाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड title=

मुंबई : ओला आणि उबेरला विरोध करण्यासाठी जय भगवान टॅक्सी महासंघाने आज आझाद मैदानात आंदोलनाचे आयोजन केले होते. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले. 

आंदोलनातल्या काही टॅक्सी चालकांनी रस्त्यावरची खासगी वाहने आणि माध्यमांची वाहने फोडलीयत. झी मीडियाची गाडीदेखील आंदोलकांनी फोडलीय. काही फोटोग्राफर्स आणि कॅमेरामनलादेखील आंदोलकांनी धक्काबुक्की केली. 

सीएसटी परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर पोलीस कुमक मागवण्यात आली आणि त्यांनी हिंसक आंदोलकांना पांगवले. आपल्या मागण्यांसाठी शांततेनं आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मात्र माध्यमांच्या आणि सर्वसामान्यांच्या गाड्या फोडून टॅक्सीचालकांनी पुन्हा एकदा आपला मुजोरपणाच जनतेसमोर दाखवून दिला.