विमानतळाजवळील उंच इमारती पाडण्याचे आदेश

मुंबई विमानतळ परिसरात निर्धारीत उंचीपेक्षा जास्त उंचीच्या इमारती, अँटेना, पोल्स त्वरित पाडण्याचे आदेश आज हायकोर्टानं दिलेत.

Updated: Sep 1, 2016, 07:30 PM IST
विमानतळाजवळील उंच इमारती पाडण्याचे आदेश  title=

मुंबई : मुंबई विमानतळ परिसरात निर्धारीत उंचीपेक्षा जास्त उंचीच्या इमारती, अँटेना, पोल्स त्वरित पाडण्याचे आदेश आज हायकोर्टानं दिलेत.

 विमानतळाच्या 4 मीटरच्या परिघात उंच इमारतींची उंची मोजण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आलते.  नव्या जुन्या सगळ्या इमारतींना हा आदेश लागू असणार आहे. 
 
 112 इमारतींना धोकायदायक इमारती म्हणून घोषित करण्याचे निर्देशही यावेळी डीजीसीएला देण्यात आले. याआधीच्या हायकोर्टाच्या आदेशानुसार सुनीता नावाच्या इमारतीवर कारवाई केल्याची माहिती यावेळी बीएमसीनं दिलीय.