तुम्ही मराठी बोलतायत, म्हणून त्यांना नोकरी मिळतेय

मोबाईल कंपन्यांचं कॉल सेंटर असो, की वसुली करणारा विभाग, अथवा एखाद्या गुंतवणूक सल्लागार कंपनीचा कॉल सेंटर.

Updated: Apr 8, 2015, 03:25 PM IST
तुम्ही मराठी बोलतायत, म्हणून त्यांना नोकरी मिळतेय title=

मुंबई : मोबाईल कंपन्यांचं कॉल सेंटर असो, की वसुली करणारा विभाग, अथवा एखाद्या गुंतवणूक सल्लागार कंपनीचा कॉल सेंटर.

 तुम्हाला जेव्हा कोणत्याही कामासाठी कॉल सेंटरमधून संपर्क साधला जातो, तेव्हा फोनवर बोलणारी व्यक्ती ही तुमच्या अन्य भाषेत संवाद साधत असते.

मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मायबोलीत बोलण्याचा आग्रह धरला, तर संबंधित व्यक्तीलाही मराठीत बोलावं लागेल, अन्यथा मराठी बोलणाऱ्या व्यक्तीकडे तो कॉल दिला जाईल.

मला मराठीतच बोलायचंय, असं जेव्हा तुम्ही सांगत असतात, तेव्हा त्यांचं काम हे न होणार असतं. मात्र तुम्ही मराठीचा आग्रह धरल्याने, अनेक मोबाईल कंपन्यांची आता दमछाक व्हायला लागली आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्यांने सांगितलंय, आता आम्हाला कॉल सेंटरमध्ये पहिल्यापेक्षा मानाचं स्थान मिळतंय, कारण अनेक लोकांनी आपल्याला मराठीच येते, मला मराठीतच अडचण नीट सांगता येते, असा आग्रह धरल्याने, कॉल सेंटरसाठी मराठी तरूण-तरूणींची मागणी वाढलीय.

मुलाखतीच्या वेळेस मराठी बोलणाऱ्यांना अधिक प्राधान्य आणि तेवढा पगार देण्याची तयारी मोबाईल कंपन्यांचे कॉल सेंटर आणि तिऱ्हाईत मोबाईल बिल वसुली, मार्केटिंग कंपन्यानी दर्शवली आहे.

तुम्ही मराठी बोलताय तेव्हा त्यांच्या हातात मानाचा रोजगार आलाय. तुम्ही मराठी बोलतायत, म्हणून त्यांना नोकरी मिळतेय असं म्हणायला हरकत काय?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.