मुंबईतही 'डिसेंबर'चा पाऊस; पुढच्या ४८ तासांत पावसाची शक्यता कायम

मुंबई, पुणे, नाशिक या तीनही शहरांना ऐन डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. मुंबईत पुढचे दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे.

Updated: Dec 13, 2014, 10:30 AM IST
मुंबईतही 'डिसेंबर'चा पाऊस; पुढच्या ४८ तासांत पावसाची शक्यता कायम    title=

मुंबई : मुंबई, पुणे, नाशिक या तीनही शहरांना ऐन डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. मुंबईत पुढचे दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. येत्या ४८ तासांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलीय. राज्यात बऱ्याच ठिकाणी गारपीट, अवकाळी पाऊस पडतोय.

निसर्गानं मनात आणलं तर तो एका क्षणात होत्याचं नव्हतं करु शकतो... आणि कसा विध्वंस घडवू शकतो.... हे गेल्या दोन दिवसांत दिसलंय. अवकाळी पावसाचा सगळ्यात जास्त फटका बसतो, तो अर्थातच शेतकऱ्याला... अचानक पाऊस आल्यावर, शेत कसं झाकणार, हा मोठा प्रश्न असतो... नाशिकमध्ये तर किलो दोन किलोच्या गारा पडल्यानं दोन दिवसांत ज्या द्राक्षांची निर्यात होणार होती, ती द्राक्षं गळून पडलीयत. कांद्याचंही नुकसान झालंय... 

कोकणात आंबा-काजूचं नुकसान 
कोकणातला आंब्याचा आणि काजूचा मोहोर झडून गेलाय. आंबा आणि काजू ओला झाल्यानं पीकांचंही नुकसानं झालंय. गारांच्या तडाख्यानं येवला तालुक्यातल्या शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झालाय. 

नाशिकचा द्राक्ष गळाला... 
पावसाचा सगळ्यात जास्त तडाखा बसलाय तो नाशिकला.... नाशिकमध्ये ऐन बहरात आलेला द्राक्षाचा बहर गळून पडलाय.... तर कांद्याचंही मोठं नुकसान झालंय. सलग दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यात गारपीट होतेय. निफाड, चांदवड तालुक्यात गारपीट सुरू आहे. कालही जिल्ह्यात गारांचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालंय.

निफाडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन
अतिवृष्टी आणि गारपिटीचा निफाड तालुक्यातल्या रुई धारणगाव आणि देवगाव परिसरातल्या पंधरा गावांना फटका बसलाय.  त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं. 

सवाई गंधर्व महोत्सव रद्द...
पुण्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे चक्क सवाई महोत्सवर रद्द करण्याची वेळ आलीय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.