तोकडे कपडे घातल्याने तरूणीला विमानात 'नो एण्ट्री'

एका तरूणीने अगदी तोकडे कपडे घातले असल्याने तिला विमान कंपनीने विमानात प्रवेश नाकारला, सोमवारी रात्री मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडीगो विमानात ही घटना घडली. तोकडे कपडे घातलेली तरूणी मुंबईहून दिल्लीला जात होती, इंडिगो प्रशासनाने तिला विमानात जाण्यापासून रोखलं होतं.

Updated: Oct 29, 2015, 09:40 PM IST
तोकडे कपडे घातल्याने तरूणीला विमानात 'नो एण्ट्री' title=

मुंबई : एका तरूणीने अगदी तोकडे कपडे घातले असल्याने तिला विमान कंपनीने विमानात प्रवेश नाकारला, सोमवारी रात्री मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडीगो विमानात ही घटना घडली. तोकडे कपडे घातलेली तरूणी मुंबईहून दिल्लीला जात होती, इंडिगो प्रशासनाने तिला विमानात जाण्यापासून रोखलं होतं.

या तरूणीचं कुटुंब कतारहून दिल्लीला निघालं होतं. कतारहून आलेलं विमान मुंबईतील छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एयरपोर्टवर रात्री अडीचच्या सुमारास आलं. दिल्लीला जाणाऱ्या विमानाची वेळ सकाळी सहाची होती.

या तरूणीला कपडे बदलून येण्यास सांगण्यात आलं

तोकडे कपडे असल्याचं कंपनीच्या प्रशासनाने या तरूणीला सांगितलं, अखेर कपडे बदलून येण्याच्या पर्यायाचा विचार झाला, अखेर ही तरूणी चेंजिंग रूममध्ये जाऊन कपडे बदलून आली. त्यानंतर त्यांना दुसऱ्या विमानाने दिल्लीला पाठवण्यात आलं.
 
हे सर्व कुटुंब ‘स्टाफ तिकीट’ ने प्रवास करत होते. या तरूणीची बहिणही ‘इंडिगो’ची कर्मचारी असल्याचं इंडिगो प्रशासनाने सांगितलं.  त्यामुळे अशा तिकीटांवर प्रवास करणाऱ्यांना ‘ड्रेस कोड’ लागू होतो, असं ‘इंडिगो’ने स्पष्ट केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.