मुंबई : भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक काल रात्री पार पडली असली तरी मंत्रिमंड़ळ विस्ताराबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचे समजते. त्यामुळे भाजपचे मित्रपक्ष नाराज असल्याचे समजते. त्यात शिवसेनेने भाजपबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपाकडून मंत्रीपदासाठी इच्छूकांची भाऊ गर्दी असल्याने विस्ताराचा गोंधळ वाढलाय. नेमकी कुणाला संधी द्यायची असा प्रश्न मुख्यमंत्री आणि भाजपाच्या राज्यातील नेत्यांसमोर आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित करण्यात आली नसल्याचे समजते.
भाजपाच्या वाट्याची सहा मंत्रीपदे रिक्त आहेत. त्यातील चार मंत्रीपदे भरण्याचा पक्षाचा विचार आहे. या चार मंत्रीपदांसाठी १८ इच्छूक आमदारांनी जोरदार लॉबिंग सुरू केलं आहे. त्यामुळेच कुणाला संधी द्यायची असा प्रश्न पक्षासमोर आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी डिनर डिप्लोमसी आखलीय. भाजपच्या सर्व मंत्र्यांसाठी भोजनाचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मंत्र्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.