राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर...

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडलाय.. भाजपच्या मंत्र्याकडे अतिरिक्त खात्याचा कारभार सोपवण्यात आलाय. 

Updated: Mar 17, 2015, 01:46 PM IST
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर...  title=

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडलाय.. भाजपच्या मंत्र्याकडे अतिरिक्त खात्याचा कारभार सोपवण्यात आलाय. 

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना खार जमीन विभाग अतिरिक्त जबाबदारी दिली तर भाजपच्या असलेले गृह राज्यमंत्री असलेले राम शिंदे यांना कृषीखाती राज्यमंत्री म्हणून अतिरिक्त कारभार दिलाय.

समाज कल्याण मंत्री असलेले दिलीप कांबळे यांच्याकडे भूकंप पूनर्वसन, उत्पादन शुल्कय याचा राज्यमंत्री म्हणून अतिरिक्त कारभार असेल. 

विजय देशमुख यांच्याकडे परिवहन राज्यमंत्री यासह आता पशूसंवर्धन, मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री म्हणून अतिरिक्त कारभार असेल. 

गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे कौशल्य विकास, बंदरे,माजी सैनिक कल्याण हे विभाग असतील. 

कॅबिनेट मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे सगळ्यात जास्त खाती होती. आता अतिरिक्त कारभार सोपवल्यामुळे खडसेंवरील भार काहीसा कमी होण्यास मदत होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.