सोनिया गांधी यांना देशातील प्रश्नांची चांगली जाण - पवार

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना गेल्या एक दोन वर्षांत देशाच्या प्रश्नांची चांगली जाण आली आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. 

Updated: Jan 20, 2015, 09:56 AM IST
सोनिया गांधी यांना देशातील प्रश्नांची चांगली जाण - पवार title=

मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना गेल्या एक दोन वर्षांत देशाच्या प्रश्नांची चांगली जाण आली आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय.

'झी २४ तास'च्या रोखठोक मुलाखतीत पवारांनी हे मत व्यक्त केलंय. याअगोदर सोनिया गांधींविषयी आपलं मत वेगळं होतं, मात्र गेल्या दोन वर्षात आपलं मत बदललं असल्याचंही ते म्हणाले. 

काँग्रेसचं अध्यक्षपद सोनिया गांधींकडून राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याचा विचार सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर पवारांचं हे विधान अत्यंत महत्वाचं आहे. 

दरम्यान, दिल्लीच्या राजकारणावर पवार यांनी भाष्य केलं. दिल्लीचे लोक शहाणे आहेत, ते शहाणपणानं निकाल देतील' अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ते झी 24 तासच्या 'रोखठोक' या कार्यक्रमात बोलत होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.