युतीतलं "पर्यावरण" बिघडले

जागतीक पर्यावरण दिनानिमित्त आज भारतरत्न सचिन तेंडूलकर आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. पण या कार्यक्रमात राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि स्थानिक आमदार तृप्ती सावंत यांना बोलावण्यात आलं नाही. 

Updated: Jun 5, 2015, 07:18 PM IST
युतीतलं "पर्यावरण" बिघडले  title=

मुंबई : जागतीक पर्यावरण दिनानिमित्त आज भारतरत्न सचिन तेंडूलकर आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. पण या कार्यक्रमात राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि स्थानिक आमदार तृप्ती सावंत यांना बोलावण्यात आलं नाही. 

पुन्हा एकदा भाजपने शिवसेनेला डावळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमाची जाहिरातीमध्ये मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र शासन यांचा समावेश असतानाही शिवसेनेच्या कोणत्याच प्रतीनिधीला बोलावण्यात आलं नाही त्यामुळे शिवसेना आणि भाजप मधील श्रेय कोण घेणार यावरून वाद समोर आला.

एमसीएमधील शरद पवार इनडोर क्रिकेट अकादमीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आहे. 

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावड़ेकर , भारतरत्न सचिन तेंडुलकर, क्रिकेटपटू अजिंक्य राहणे, रोहित शर्मा यांनी वृक्षारोपण केले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.