अपघात कमी करण्यासाठी नितिन गडकरींचे पर्याय

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांनी रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यावर जोर दिला आहे. मात्र पाण्याला सर्वाधिक प्राथमिकता देण्यात येणार असल्याचं नितिन गडकरी यांनी म्हटलंय.

Updated: Jan 8, 2015, 05:34 PM IST
अपघात कमी करण्यासाठी नितिन गडकरींचे पर्याय title=

मुंबई : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांनी रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यावर जोर दिला आहे. मात्र पाण्याला सर्वाधिक प्राथमिकता देण्यात येणार असल्याचं नितिन गडकरी यांनी म्हटलंय.

अनेक ठिकाणी जलवाहतुकीचा पर्याय उभा राहिल्यास रस्त्यावरील अपघातांचं प्रमाण कमी होऊ शकणार असल्याचंही गडकरी यांनी म्हटलंय. 

भारतात दरवर्षी ५ लाख अपघात होतात. यात ५ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो, अशी माहिती यावेळी नितिन गडकरी यांनी दिलीय.

सर्वात जास्त अपघात हे कंटेनरमुळे होतात, गोवा-मुंबई रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात अपघात होतात. तेव्हा हे कंटेनर समुद्रमार्गे म्हणजेच जलवाहतुकीने नेणे हा चांगला पर्याय होऊ शकेल, असं गडकरींनी म्हटलंय.

अपघात कमी करणे हे सरकारची जबाबदारी असल्याचंही नितिन गडकरी यांनी म्हटलंय.

रेल्वे आणि रस्ते विकासात बऱ्यापैकी कामं होत आहेत, मात्र पाणी आणि जलवाहतूक या बाबतीत पाहिजे तेवढी कामं झालेली नाहीत.

यामुळे पाणी ही आमची पहिला प्राथमिकता आहे, त्यांनतर रेल्वे आणि तिसऱ्या क्रमांकावर रेल्वे ही प्राथमिकता असल्याचं नितिन गडकरी यांनी म्हटलंय. या बाबतीत मुख्यमंत्र्यांशी आपली चर्चा झाली असल्याचंही नितिन गडकरी यांनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.