सिंगापूरला जमलं ते मुंबईला जमत नाही?

शुक्रवारी मुंबईत पाऊस बरसला आणि मुंबईची तुंबई झाली. सिंगापूरही मुंबईसारखंच आहे. तेही समुद्र किनाऱ्यावरच वसलंय. पण, तिथे कधी पाणी तुंबत नाही. जे सिंगापूरला जमलं, ते मुंबईला का जमत नाही?

Updated: Jul 12, 2014, 09:30 AM IST
सिंगापूरला जमलं ते मुंबईला जमत नाही? title=

मुंबई : शुक्रवारी मुंबईत पाऊस बरसला आणि मुंबईची तुंबई झाली. सिंगापूरही मुंबईसारखंच आहे. तेही समुद्र किनाऱ्यावरच वसलंय. पण, तिथे कधी पाणी तुंबत नाही. जे सिंगापूरला जमलं, ते मुंबईला का जमत नाही?

मुंबई आणि सिंगापूर दोघांचीही भौगोलिक रचना साधारणपणे सारखीच आहे. मुंबईसारखा पाणी साचण्याचा प्रकार सिंगापूरमध्ये १९५० च्या दशकात होत होता. पण, आज सिंगापूरमध्ये पाणी साचणं हा इतिहास झालाय.

मलेशियापासून १९५४ मध्ये सिंगापूर वेगळं झालं. तेव्हा सिंगापूरची स्वतःची गरज भागवण्यासाठीही पुरेसं पाणी नव्हतं. ७०० स्क्वेअर किलोमीटरच्या सिंगापूरमध्ये एकही नदी नाही. पण, गेल्या वीस वर्षांत सिंगापूरमध्ये जलयोजना आणि व्यवस्थापनामध्ये कमालीची सुधारणा झालीय.

त्यासाठी सिंगापूरनं मोठमोठी पंधरा जलायशं तयार केली. संपूर्ण सिंगापूरमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी अंडरग्राऊण्ड पाईपचं जाळं आहे. पावसाचं पाणी या अंडरग्राऊंड पाईप्समधून समुद्रात पोहोचतं आणि मग हे पाणी शुद्ध करुन नागरिकांच्या घरांमध्ये पोहोचवलं जातं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.