पार्टी शौकिनांसाठी 'सायलेन्ट डिस्को'चा पर्याय

न्यू ईअरची पार्टी कशी करायची? याचाच विचार सध्या सगळे करत आहेत. पण पार्टी म्हणलं की आवाज आणि धांगडधिंगा... पण, यावरच उपाय म्हणून मुंबईत यंदा पार्टी करण्याचा नवा ट्रेंड रुजू होतोय.

Updated: Dec 29, 2016, 08:45 PM IST
पार्टी शौकिनांसाठी 'सायलेन्ट डिस्को'चा पर्याय  title=

दिपाली जगताप पाटील, मुंबई : न्यू ईअरची पार्टी कशी करायची? याचाच विचार सध्या सगळे करत आहेत. पण पार्टी म्हणलं की आवाज आणि धांगडधिंगा... पण, यावरच उपाय म्हणून मुंबईत यंदा पार्टी करण्याचा नवा ट्रेंड रुजू होतोय.

आवाज न करता पार्टी...

पार्टी करताना तुम्ही प्रचंड आवाज करतायत म्हणून यंदा आँटी पोलिस बोलवणार नाही... कारण आवाज न करताच पार्टी करण्याचा ट्रेंड मुंबईत आलाय. यालाच म्हणतात सायलेन्ट डिस्को... 'ए दिल है मुश्किल' या सिनेमातल्या ब्रेकअप साँगमध्येही अशीच सायलेन्ट पार्टी दाखवण्यात आली. त्यानंतर आता सायलेन्ट पार्टीची नवी संकल्पना आलीय. पार्टीही करायची आणि आवाजही नाही होणार हे कसं शक्य आहे? असे तुम्हाला वाटेल पण हे शक्य आहे.

सायलेन्ट डिस्को म्हणजे काय?

- या पार्टीत 3-4 डिजे असतात जे वेगवेगळी गाणी वाजवतात

- पार्टीत कानाला हेडफोन्स लावणे बंधनकारक असते. हेडफोन्स लावूनच डान्स करायचा

- यात गाणं चॉईस करण्यासाठी चार पर्याय असतात

- हवे ते गाणे लाऊन डान्स करायचा

ध्वनीप्रदूषणाला आळा... 

नुकतंच आयआयटी मुंबईच्या 'मूड इंडिगो'मध्ये अशी सायलेन्ट पार्टी झाली ज्यात पाच हजाराहून अधिक मुलांनी सहभाग घेतला. सायलेन्ट डिस्को फेमस होण्याचे आणखी एक कारण म्हणजे रात्री 10 वाजल्यानंतरही पार्टी सुरु ठेवता येतो. ध्वनीप्रदूषण होत नसल्याने या नवीन संकल्पनेचे स्वागत सामाजिक कार्यकर्तेही करत आहेत. 

न्यू ईअर पार्टीसाठी तर सायलेन्ट डिस्कोचा ट्रेंड आलाय पण येत्या काळात मुंबईत नाईट लाईफही सुरु होणार आहे... त्यामुळे ध्वनी प्रदूषण टाळता येऊन रात्रभर पार्टी करता येणार असेल तर नवीन वर्षाचे स्वागत या नव्या संकल्पनेने सुरु करायला काय हरकत आहे...