नियतीच्या खेळासमोर अखेर 'ते' हरले

सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेत आतापर्यंत २४ जणांचे मृतदेहांचा शोध घेण्यात यश आलेय. या भीषण दुर्घटनेत जयगड-मुंबई एसटीतील चालक श्रीकांत कांबळे यांचा मृत्यू झाला. 

Updated: Aug 6, 2016, 12:53 PM IST
नियतीच्या खेळासमोर अखेर 'ते' हरले title=

मुंबई : सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेत आतापर्यंत २४ जणांचे मृतदेह सापडलेत. या भीषण दुर्घटनेत जयगड-मुंबई एसटीतील चालक श्रीकांत कांबळे यांचा मृत्यू झाला. 

जयगड-मुंबई या एसटीमध्ये सुरेश मालपे यांची ड्युटी होती. मात्र चिपळूणमध्ये गाडी आल्यावर श्रीकांत कांबळे यांनी गाडी चालवण्यास घेतली. मात्र त्यांचा हा प्रवास अखेरचा ठरला.

मुंबईच्या या मार्गावर ते ड्युटी घेत नसत. मात्र नशीब कधी कोणाला कुठे नेईल काही सांगता येत नाही. त्यांनी सहकारी सुरेश मालपे यांच्याकडून ड्युटी मागून घेतली. 

मुलाच्या अॅडमिशनसाठी म्हणून ते मुंबईला जात होते. मात्र मुंबईपर्यंतचा प्रवास त्यांचा पूर्ण झालाच नाही. याच गाडीत त्यांच्यासह त्यांचा मुलगाही होता. सावित्री नदीवरी पुलाच्या दुर्घटनेत या दोन्ही बाप-लेकाचा करुण अंत झाला. नियतीच्या खेळासमोर माणसाचे काही चालत नाही हेच खरे.