मुंबई : विरार येथे मातृत्वाला कलंकित करणारी घटना घडलेय. धक्कादायक बाब म्हणजे बाळाचा गर्भातच दीड लाखात सौदा केल्याची घटना उघडकीस आली आहे.
बाळ विकत घेणाऱ्या दाम्पत्याने मंगळवारी मध्यरात्री विरार पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदवल्यानंतर हे प्रकरण पुढे आले. आयेशा आणि शकील खान यांनी गर्भातच बाळाचा सौदा केला.
खान दाम्पत्याने पूनम आणि हिरालाल परमार या निःसंतान दांपत्याला दीड लाखात बाळ विकण्याबाबत नोटरीद्वारे करार केला. त्यानुसार आयेशाने आठव्या महिन्यांत पूनम परमार नावाने गणेश नर्सिंग होममध्ये नाव नोंदवले. १५ जानेवारी २०१५ रोजी तिने मुलाला जन्म दिला. त्यानंतर मुलाचा ताबा परमार दांपत्याकडे देण्यात आला.
त्यानंतर दोन महिन्यांनंतर आयेशा हिने आत्महत्या करण्याची धमकी दिली आणि खान कुटुबीयांनी बाळाचा ताबा घेतला. पैसेही गेले आणि बाळाचा ताबाही गेल्याने परमार यांनी विरार पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली.
पोलिसांचा अंदाज
खान दाम्पत्याला आधीच दोन मुली आहेत. एक मुलगी आजारी असते. त्यामुळे आर्थिक चणचण आहे. त्यामुळे त्यांनी अस पाऊल उचले असेल. त्यातच मात्र, मुलगा झाल्याने त्यांनी तो परत घेतला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.