मुंबई : एक अशी जागा आहे, जेथे फक्त एक टॅक्सी थांबू शकते, पण या ठिकाणी टॅक्सी थांबली तर ही टॅक्सी वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरते. पाहा कसा होता एक टॅक्सीचा थांबा आणि वाहतुकीचा खोळंबा.
वरळीतील पांडुरंग बुधकर मार्गावर एलफिस्टनकडून वरळी दुरदर्शनकडे जाणाऱ्या रस्त्यावर कमला मिल आणि मधू इस्टेट या बिल्डिंगचे गेट आहेत. पहिल्या फोटोत दाखवल्याप्रमाणे, कमला मिलच्या गेटमधून आत बाहेर जाणारे वाहनं येत जात असतात, तर दुसऱ्या गेटमध्ये मधू इस्टेटची वाहनं आत जात असतात, या दोन्ही गेटमध्ये जी जागा आहे, त्यात नेहमी एक टॅक्सी आरामात उभी असते, प्रत्येक वेळी टॅक्सी बदललेली असते, त्यांना एकच अपेक्षा असते, कमला मिल मधून कुणीतरी मोठा प्रवासी येईल, आणि लांबचं भाडं मिळेल.
मात्र या टॅक्सीमुळे कमला मिलमधून येणारी वाहनं, मागून एलफिस्टनकडून वरळी दुरदर्शनकडे जाणारी वाहन, आणि मधू इस्टेटमध्ये जाणाऱ्या वाहनांना मोठा खोळंबा होता, सकाळी आणि संध्याकाळी तर गोंधळ सुरूच असतो, हे दृश्य तुम्हाला थिएटरात लागलेल्या सिनेमा पाहण्यासारखं कधीही पाहता येईल. हॉर्न आणि भांडणींमुळे रस्त्यावरून वापरणारेही आश्चर्याने पाहत असतात. हे होतं फक्त एका टॅक्सीमुळे.
हे अनेक वर्षांपासून सुरू आहे, पण ही समस्या एका मिनिटांत सुटू शकते, जर वाहतूक पोलिसांनी या दोन गेटमधील जागा, ज्या ठिकाणी नेहमीच टॅक्सी लावली जाते, ती जागा नोपार्किंग करावी, नो पार्किंगचा बोर्ड तेथे लावला तर वाहतुकीची मोठी समस्या सुटू शकेल.
तुम्हीही वाहतुकीचा असा खोळंबा आणि वाहतूक का खोळंबते याचा फोटो पाठवला तर त्याला प्रसिद्धी दिली जाईल, आपला फोटो zee24taasonline@gmail.com वर पाठवा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.