शिवसैनिकांचं जोरदार विरोध प्रदर्शन, खासदार गजानन किर्तीकरांच्या कार्यालयावर मोर्चा

युतीसाठी शिवसेना भाजपमध्ये खलबतं सुरू असताना वॉर्ड ८० मध्ये शिवसैनिकांनी जोरदार विरोध प्रदर्शन करत खासदार गजानन किर्तीकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. निवडणुकीत स्थानिक अनिल माने यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी या मोर्चादरम्यान करण्यात आली.

Updated: Jan 16, 2017, 08:41 AM IST
शिवसैनिकांचं जोरदार विरोध प्रदर्शन, खासदार गजानन किर्तीकरांच्या कार्यालयावर मोर्चा title=

मुंबई : युतीसाठी शिवसेना भाजपमध्ये खलबतं सुरू असताना वॉर्ड ८० मध्ये शिवसैनिकांनी जोरदार विरोध प्रदर्शन करत खासदार गजानन किर्तीकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. निवडणुकीत स्थानिक अनिल माने यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी या मोर्चादरम्यान करण्यात आली.

गेली 20 वर्ष या वॉर्डात बाहेरचा उमेदवार दिला जात असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केली. त्यामुळे यावेळी स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी स्थानिकालाच प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन खासदार गजानन किर्तीकर यांनी दिलं.