मुंबई : दहशतवाद्याला जिवंत पकडणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या दोघांना शिवसेनेने बक्षिस दिलं आहे. शिवसेनेचे खासदार राजकुमार धूत यांनी ही घोषणा केली आहे, धूत यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्याला पकडणारे, राजेश कुमार आणि राजेश शर्मा यांना 5 लाख बक्षिस देण्यात येणार आहे.
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बुधवारी एका दहशतवाद्याने दोन-तीन जणांना ओलीस ठेवलं होतं, पण या लोकांनीच त्याला पकडलं, पकडण्यात आलेला दहशतवादी १२ दिवसांपासून भारतात होता, स्लिपर सेलने त्याला हत्यारं देखिल पुरवली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.