www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तान कलाकारांविरोधात केलेल्या सेना कार्यकर्त्यांच्या राड्याचं समर्थन केलंय. तर हा आमचा मुद्दा आहे, अशा दावा मनसेनेने केलाय. मात्र, आम्ही शांतीचा संदेश देण्यासाठी आलोय. त्यामुळे हा संदेश देऊन जाणार, असा निर्धार पाकिस्तान कलाकारांनी केलाय. दरम्यान, राड्याप्रकऱणी १५ जणांना अटक करण्यात आलेय.
पाकिस्तानी कलाकारांना भारतात खपवून घेतलं जाणार नसल्याचं, संजय साऊत यांनी सांगितलंय. तर शिवसेनेनं केवळ प्रसिद्धीसाठी राडेबाजी केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय.
पाकिस्तानी कलाकारांविरोधात शिवसेनेनं केलेल्या हंगाम्यावरून आता मनसे आणि शिवसेनेत जुंपण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी कलाकारांविरोधातला मुद्दा हा मनसेचाच असल्याचं दावा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलाय.
आता निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला जाग आली असून आंदोलनाचा आटापिटा सुरू असल्याचा आरोप मनसेनं शिवसेनेवर केलाय. त्यामुळं आता पाक विरोधातल्या आंदोलनावरून मनसे-शिवसेनेत जुंपण्याची शक्यता आहे.
आज जे काही घडलं ते अनपेक्षित होतं, मात्र आम्ही कार्यक्रम सादर करणारच असा निर्धार पाकिस्तानी कलाकार मेकाल हसन यांनी व्यक्त केलाय. आम्ही भारतात शांतीचा संदेश द्यायला आलो आहोत. त्य़ामुळे आम्ही तो संदेश देऊनच जाणार असल्याचं या कलाकारांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, या राड्याप्रकरणी १५ शिवसेना कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय. तसंच पाकिस्तानी कलाकारांना पुरेशी सुरक्षा पुरण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.