शिवसेना आमदाराने १ तास रोखून धरली एक्स्प्रेस

इतर गाड्यांच्या वेळा कोलमडल्या

Updated: Apr 14, 2016, 05:40 PM IST
शिवसेना आमदाराने १ तास रोखून धरली एक्स्प्रेस title=

मुंबई : शिवसेनेचे आमदार आणि त्यांच्या समर्थकांनी आवडती सीट मिळण्यासाठी  छत्रपति शिवाजी टर्मिनस (सीएसटी) वर एक्सप्रेसला जवळपास १ तास रोखून धरलं. याचा २००० प्रवाशांना मोठा फटका बसला. यामुळे इतर गाड्यांच्या वेळा ही कोलमडल्या.

बुधवारी रात्री नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांनी देवगिरी एक्सप्रेसची चैन वारंवार खेचून एक्स्प्रेस रोखली. रात्री १० वाजेपर्यंत त्यांनी ही एक्सप्रेस रोखून धरली. एक सेकेंड एसी कोचमध्ये साइड बर्थ दिल्यामुळे ते नाराज होते. रेल्वे विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वत:चं नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती सांगितली आहे. 

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे या आमदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. गैरसोईंकडे लक्ष वेधण्यासाठी देवगिरी एक्स्प्रेस  रोखल्याचं नांदेडचे शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी सांगितलंय. 

शिवसेना आमदारांचा आरोप :

ट्रेनमध्ये जेवण करत असताना प्लेटमध्ये उंदीर खेळत असल्याचा व्हिडिओ पाटील यांनी दिलाय. याशिवाय माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील या वयस्कर नेत्यांना, वरचा बर्थ देण्यात आला. तर इतर आमदारांना साइड बर्थ दिल्याची त्यांनी तक्रार केली. याशिवाय डब्यातली अस्वच्छता, शौचालयात पाणी नाही, दलालांचा सुळसुळाट, या आणि इतरही असुविधांकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधलं. रेल्वे अधिका-याला 50 कॉल करुनही त्याने फोन उचलला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.