'तूर' मे कुछ काला है! खोतकरांनी केलेल्या तूर विक्रीची चौकशी

शिवसेना नेते आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या कुटुंबानं केलेल्या तूर विक्रीची चौकशी स्थानिक पोलीस आणि प्रशासनानं सुरु केलीय.

Updated: May 23, 2017, 11:05 AM IST
'तूर' मे कुछ काला है! खोतकरांनी केलेल्या तूर विक्रीची चौकशी title=

मुंबई : शिवसेना नेते आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या कुटुंबानं केलेल्या तूर विक्रीची चौकशी स्थानिक पोलीस आणि प्रशासनानं सुरु केलीय.

नाफेड आणि बाजार समितीच्या केंद्रांवर अतिप्रचंड प्रमाणात तूर विक्री केल्यामुळे त्यांची चौकशी करण्याचे आदेश सरकारनं दिले होते. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी एकाच दिवशी 187 क्विंटल तूर विकली असून दोन दिवसांत तब्बल १९ लाख रुपयांची तूर विक्री केल्याची, धक्कादायक माहिती समोर आलीय. 

खोतकर यांच्या नावे नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर 14 फेब्रवारी 2017 या एकाच दिवशी 93.50 आणि 93.50 क्विंटल तूर विकली गेल्याची नोंद आहे. जालना जिल्ह्यातील हिसवन या गावात तूर पिकवल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलंय. 

खोतकरांचा भाऊ संजय खोतकर यांची पत्नी योगिता खोतकर यांच्या नावे 50-50 क्विंटल अशी एकूण 100 क्विंटल तूर विकली गेल्याची माहिती आहे. पुन्हा 18 फेब्रुवारीला संजय खोतकरांनी 45-45 क्विंटल अशी एकूण 90 क्विंटल तूर विकल्याची नोंद आहे. 

संजय आणि योगिता यांनी गाडेसावर गाव इथं तूर पिकवल्याचा उल्लेख आहे. एकूण 377 क्विंटल तूर विकल्याचा आरोप खोतकर कुटुंबावर आहे. खोतकर कुटुंबीयांच्या नावे एकूण 19 लाख 3 हजार 850 रुपयांची तूर विकली गेल्याची माहिती आहे.