राज्यभर शिवजयंतीचा मोठा उत्साह, पंतप्रधानांनीही दिल्या शुभेच्छा

शिवजयंती निमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. निवडणुकांच्या धामधुमीत शिवजयंतीचा उत्साह ही शिवप्रेमींच्या चेह-यावर दिसतोय. 

Updated: Feb 19, 2017, 09:18 AM IST
राज्यभर शिवजयंतीचा मोठा उत्साह, पंतप्रधानांनीही दिल्या शुभेच्छा title=

मुंबई : शिवजयंती निमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. निवडणुकांच्या धामधुमीत शिवजयंतीचा उत्साह ही शिवप्रेमींच्या चेह-यावर दिसतोय. 

किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्सवाला सुरूवात झालीय. हजारो शिवप्रेमी त्यासाठी शिवनेरीवर हजर आहेत. पहाटेपासूनच शिवप्रेमी शिवनेरीवर दाखल व्हायला सुरूवात झाली होती. 

पहाटेच शिवज्योतीही गडावरून रवाना झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवनेरीवर शासकीय पूजा केली जाणारय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केलाय. ट्विट करून त्यांनी शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्यात.