शिवसेनेचं आंदोलन कायम, अफवांवर विश्वास ठेऊन नका - राऊत

 मुंबईत पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध होता, आहे आणि कायम राहणार अशी भूमिका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली. 

Updated: Oct 12, 2015, 04:43 PM IST
शिवसेनेचं आंदोलन कायम, अफवांवर विश्वास ठेऊन नका - राऊत  title=

मुंबई :  मुंबईत पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध होता, आहे आणि कायम राहणार अशी भूमिका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली. 

पाकिस्तान विरोधी भूमिका ही शिवसेनेची आत्ताची नाही तर गेल्या २५-३० वर्षांपासूनची आहे. जगाला माहिती आहे की शिवसेना ही प्रखऱ राष्ट्रवादी पक्ष आहे. यात कोणत्याही पक्षाचा, राजकारणाचा प्रश्न नाही आपल्या देशाचा प्रश्न आहे त्यामुळे आमचा विरोध कायम राहणार असेही त्यांनी स्पष्ट केले. 

शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेतले अशा प्रकारेचे खोटे मेसेज मीडियामध्ये पसरविण्यात येत आहे, असे राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

भारतविरोधी कारवाया करणाऱ्या कसुरी यांच्या विरोध आज सकाळी पाकिस्तानचे 'एजंट' असलेल्या सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाही फेकण्यापासून सुरू झाला आहे. हे काम शिवसैनिकांनी केले आहे. हे आम्ही कबूल करतो, असेही राऊत यांनी सांगितले. 
 
कसुरी यांच्या ‘नायदर अ हॉक नॉर अ डोव्ह’ पुस्तकाचं प्रकाशन आज नेहरू सेंटरला आहे. त्यापूर्वी आज सकाळी ओआरएफ फौउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शिवसैनिकांनी शाही फेकली होती. या घटनेनंतर नेहरू सेंटरला छावणीचं स्वरूप आलं आहे.

दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमात कसुरी यांनी भारत विरोधी भूमिका घेणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी फोन करून उद्धव ठाकरेंना सांगितले असल्याचे राऊत म्हटले. 

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री कसुरी यांनी नेहमी भारत विरोधी भूमिका घेतली आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भारताच्या फुटरवाद्यांना एकत्र करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी फुटरवाद्यांना भारतविरोधी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे काश्मीर प्रश्न पाकिस्तानची बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता, याची आठवणही राऊत यांनी करून दिली.