युती का तुटली?, शिवसेनेचा भाजपाला सवाल

विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेची युती तुटली? हे अजूनही शिवसेना नेत्यांच्या मनात आहे. कारण शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यावर टिका केली आहे.

Updated: May 27, 2015, 06:41 PM IST
युती का तुटली?, शिवसेनेचा भाजपाला सवाल title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेची युती तुटली? हे अजूनही शिवसेना नेत्यांच्या मनात आहे. कारण शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यावर टिका केली आहे.

 "प्रखर हिंदुत्व आणि राष्ट्रहिताच्या मुद्यांवर विधानसभेच्या वेळी युती एका झटक्‍यात का तुटली? वातावरण का बिघडले?‘ अशा शब्दांत ही टीका केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापुरात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन लढवणार आहेत, असे म्हटले होते. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत त्यांनी धीराची आणि संयमाची भूमिका घेतल्याचेही अग्रलेखात म्हटले आहे. 

मात्र फडणवीस असताना विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रखर हिंदुत्व आणि राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर २५ वर्षांची युती एका झटक्यात का तुटली? वातावरण का बिघडले? युती का व कोणामुळे तुटली? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. 

‘महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचे युती सरकार उत्तम चालले असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याने अनेकांच्या मनातील शंकांना पूर्णविराम मिळाला असावा. ही युती तुटावी व सरकार पडावे अशी अनेकांची इच्छा असली तरी ती पूर्ण होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.‘ असेही अग्रलेखात म्हटले आहे. 

तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बरे चालले आहे या वक्‍त्याचा संदर्भ देत "यापेक्षा जास्त बरे चालले पाहिजे!‘ अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.