श्रेयाच्या वादावरून सेना-मनसेत जुंपली

मुंबई महापालिकेच्या दहिसर इथल्या मुरबाळी जलतरण तलावाच्या भूमीपूजनाच्या श्रेयावरून मनसे आणि शिवसेनेत जुंपलीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 28, 2013, 08:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई महापालिकेच्या दहिसर इथल्या मुरबाळी जलतरण तलावाच्या भूमीपूजनाच्या श्रेयावरून मनसे आणि शिवसेनेत जुंपलीय. मुरबाळी जलतरण तलाव आणि व्यायामशाळेचा प्रस्ताव शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या काळात पास झाला होता. त्यामुळे शिवसेनेला क्रेडिट मिळालं पाहिजे, असा दावा माजी नगरसेविकेनं केलाय. या क्रेडीट वॉरमुळे मनसेचे स्थानिक आमदार प्रविण दरेकरांचं नावंच पालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेतून वगळण्यात आलं. त्यामुळे मनसेने भूमीपूजनाच्या कार्यक्रमात पालिकेला राजकीय प्रोटोकॉलची आठवण करून दिली.....
दहिसर इथल्या मुरबाळी जलतरण तलावाच्या निमित्ताने शिवसेना विरूद्ध मनसे असा सामना पुन्हा रंगलाय... मुरबाळी जलतरण तलाव आणि व्यायामशाळेच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रम पत्रिकेत मनसेचे स्थानिक आमदार प्रविण दरेकरांच नावच छापवण्यात आलं नव्हतं. एवढंच नव्हे तर मनसेच्या स्थानिक नगरसेवकांचं नावही कार्यक्रम पत्रिकेतून काढून टाकण्यात आलं. मात्र स्थानिक नगरसेवकाला डावलून भूमिपूजनाचा कार्यक्रम होऊ शकत नाही, या राजकीय प्रोटोकॉलची मनसेनं पालिका प्रशासनाला आठवण करून दिली. त्यामुळं मुरबाळी जलतरण तलावाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात श्रेयासाठी लढणारे शिवसेना आणि मनसेचे नेते एकाच मंचावर प्रथमच एकत्र पाहायला मिळाले.....
मुरबाळी जलतरणतलाव आणि व्यायामशाळेचा प्रस्ताव शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या काळात पास झाला होता. त्यामुळे शिवसेनेला क्रेडिट मिळालं पाहिजे, असा दावा माजी नगरसेविकेनं केला. तर दोन्ही आजी, माजी नगरसेवकांच्या प्रयत्नामुळे हे विकासकाम होत असल्याचा खुलासा महापौरांना करावा लागला...
या विकासकामांचं श्रेय ज्यांना लाटायचं असेल त्यांनी खुशाल लाटावं, पण त्यामध्ये पालिकेच्या कृपेने काही चांगली विकासकामे होत असतील तर त्यासारखा दुसरा आनंद नाही...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.