मुंबई : शिवसेनेनं उचलून धरलेल्या मुद्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा भाजपकडून केला जातोय.
उत्तर मुंबईतल्या गोरेगावमधल्या पशू बाजाराशी संबंधित हा नवा श्रेयवाद आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी या पशू बाजाराची काल पाहाणी केली. अकरा हजार चौरस मीटरमध्ये पसरलेला हा पशू बाजार, गेल्या कित्येक वर्षांपासून बंद होता.
या बजारातला दोन हजार चौरस मीटर भूखंड या आधीच बेस्टला देण्यात आला आहे. आता उर्वरीत जागा सुद्धा बेस्ट तसेच विकास आराखड्यामध्ये नमूद असलेल्या रस्तासाठी दिली जाणार आहे.
ही जागा दिल्यामुळे गोरेगावमधली वाहतूक कोंडीची समस्या सूटायला मदत होणार आहे. तर बेस्ट डेपोचा प्रश्नही सुटणार आहे. विशेष म्हणजे पशू बाजाराच्या जागेचा हा प्रश्न कित्येक वर्षांपासून शिवसेनेनं उचलून धरला होता.
मात्र आता स्थानिक आमदार विद्या ठाकूर यांच्या पुढकाराने याबाबत निर्णय घेत, भाजपनं पुन्हा एकदा कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.