मुंबई : २४ वर्षांच्या शीना बोरा हत्याकांडातील एक-एक करून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर आलेत... त्यानंतर आता लवकरच या नात्यांच्या अक्राळ विक्राळ गुंतागुंतीचं आणि हत्येचं प्रकरणाचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
रायगडच्या जंगलात सापडलेलं शीनाबोराच्या शरीराचे अवशेष आज फॉरेन्सिक आणि डीएनए टेस्टसाठी पाठवण्यात येत आहेत.
अधिक वाचा : शीना बोरा हत्याकांड आत्तापर्यंत...
संजीव खन्नानं दिली 'हत्ये'ची कबुली
शीनाचा खून झाला त्यावेळी आपण गाडीत झोपलो होतो... अशी पहिल्यांदा बतावणी करणाऱ्या संजीव खन्नानं अखेर आपल्या कृत्याची कबुली दिलीय. शीनाचा गाडीतच गळा दाबून हत्या करणारा संजीव खन्नाचं होता, हे यामुळे सिद्ध होतंय. यावेळी गाडीत ड्रायव्हर श्याम राय आणि शीनाची आई इंद्राणीदेखील होते.
हत्येअगोदर इंद्राणीनं केली होती 'रेकी'
शिनाच्या हत्येचा सगळा प्लान इंद्राणीनंच आखला होता... इतकंच नाही तर ज्या ठिकाणी शीनाचा मृतदेह जाळण्यात आला त्या रायगडच्या जंगलाची 'रेकी'ही इंद्राणीनं अगोदर केली होती.
२४ एप्रिल रोजी शीनाचा खून केल्यानंतर शीनाचा मृतदेह ज्या गाडीत होता ती गाडी स्टार टीव्हीचे माजी सीईओ आणि इंद्राणीचे पती पीटर मुखर्जी यांच्या बंगल्याच्या आवारातच रात्रभर उभी होती. दुसऱ्या दिवशी शीनाचा मृतदेह रायगडच्या जंगलात नेऊन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.