नात्यांची गुंतागुंत वाढली : शीना-मिखाईलचे वडीलही वेगवेगळे?

एखाद्या नात्याची गुंतागुंत किती मोठी असू शकते, याचं उदाहरण म्हणजे शीना बोरा हत्याप्रकरणात प्रमुख आरोपी असलेली तिची इंद्राणी मुखर्जी आणि तिचे संबंध... 

Updated: Aug 28, 2015, 03:18 PM IST
नात्यांची गुंतागुंत वाढली : शीना-मिखाईलचे वडीलही वेगवेगळे? title=

मुंबई : एखाद्या नात्याची गुंतागुंत किती मोठी असू शकते, याचं उदाहरण म्हणजे शीना बोरा हत्याप्रकरणात प्रमुख आरोपी असलेली तिची इंद्राणी मुखर्जी आणि तिचे संबंध... 

इंद्राणीनं शीना बोरा ही आपली बहिण नसून मुलगी असल्याचं एव्हाना पोलिसांसमोर कबूल केलंय. मिखाईल हा देखील इंद्राणीचाच मुलगा (जो स्वत:ला शीनाचा भाऊ म्हणतो)... पण, शीना आणि मिखाईल यांचे वडील मात्र वेगळे असल्याचं, 'टाईम्स ऑफ इंडिया'नं म्हटलंय. 

स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणीचे कोलकातामधल्या एका बिझनेसमनसोबतही  संबंध होते, असं आता समोर येतंय. इंद्राणीचा पती संजीव खन्ना आणि हा बिझनेसमन दोघं मित्र होतं. आता  ६० वर्षांच्या असलेल्या या बिझनेसमनला मुलंही आहेत. 

अधिक वाचा : शीना बोरा हत्याकांड आत्तापर्यंत... 

आत्तापर्यंत मिखाईलनं आपल्या जैविक पित्याबद्दल बोलण्यास नकारच दिलाय. पण, इंद्राणीचा सिद्धार्थ दास (पहिला पती), संजीव खन्ना (दुसरा पती) आणि पीटर मुखर्जी (सध्याचे पती) यांच्यासोबतच कोलकत्याच्या बिझनेसमनसोबत असलेल्या संबंधांचा खुलासाही आता झालाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.