शेअर बाजार घसरला, सोनेही झाले स्वस्त

देशात शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेंसेक्स 17.37 अंकानी घसरुन 25,006.98 वर बंद झाला. तर दुसरीकडे सोन्याचा भाव 280 रुपयांनी घसरला. सोने प्रति तोळा 28,450 वर आले आहे.

Updated: Jul 15, 2014, 09:02 AM IST
शेअर बाजार घसरला, सोनेही झाले स्वस्त title=

मुंबई : देशात शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेंसेक्स 17.37 अंकानी घसरुन 25,006.98 वर बंद झाला. तर दुसरीकडे सोन्याचा भाव 280 रुपयांनी घसरला. सोने प्रति तोळा 28,450 वर आले आहे.

मुंबई शेअर मार्केटमध्ये 30 शेअरवर आधारित सेंसेक्स निर्देशांक 68.81 अंकाची तेजी दिसून येऊ 25,093.16 वर खुला झाला. 17.37 अंक म्हणजे 0.07 टक्क्यांची घसरण पाहायला मिळून 25,006.98 वर बंद झाला.

दिवशभर बाजारात सेंसेक्स 25,095.76च्यावर आणि 24,892.00 च्याखाली होता. सेंसेक्सने 30 शेअरमध्ये तेजी दिसून आली. हिंदाल्को इंडस्ट्रीज (4.15 टक्के), टाटा पॉवर (2.80 टक्के), टाटा स्टील (2.60 टक्के), टाटा मोटर्स (2.41 टक्के) आणि अॅक्सिस बँक (1.68 टक्के) यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली होती.
 
शेअरमध्ये घसरण झाल्यापैकी इन्फोसिस (2.97 टक्के), हिंदुस्तान युनिलीव्हर (2.64 टक्के)
विप्रो (2.19 टक्के), एसएसएलटी (1.28 टक्के) आणि एनटीपीसी (1.27 टक्के) यांचा समावेश होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई)चे 50 शेअरवर आधारित निर्देशांक सूचकांक निफ्टी 9.40 अंकांने तेजी बरोबर 7,469.00 वर खुला झाला. 5.45 अंकानी म्हणजे 0.07 टक्के यात घसरण होऊन तो 7,454.15 वर बंद झाला.

बीएसईमध्ये 12 पैकी 6 क्षेत्रात तेजी दर्ज दिसून आली. भांडवली वस्तू (1.14 टक्के), वाहने (0.99 टक्के), मेटल (टक्के 0.97), वीज (टक्के 0.76) आणि बँकिंग (टक्के 0.30) तेजीचा रेकॉर्ड पाहायला मिळाला. बीएसई उपभोगासाठी (2.24 टक्के ), माहिती तंत्रज्ञान (1.27 टक्के), तंत्रज्ञान (0.99 टक्के), स्थावर मालमत्ता (0.78 टक्के) आणि आरोग्य सेवा (0.53 टक्के ) या क्षेत्रात सर्वात जास्त घसरण झाली.

बीएसईमध्ये नकारात्मक व्यवसायाचा कल दिसून आला. 1,075 शेअरमध्ये तेजी होती. 1,742 शेअर्स भाव घसरले होते. तर  110 शेअर्स भावात कोणताही बदल दिसून आला नाही. त्यांचे भाव कायम होते.

शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाल्यानंतर सोने दरातही घसरण पाहायला मिळाल्या. त्यामुळे सोने 280 रुपयांनी घसरल्याने सोने बाजारात सोने स्वस्त झाले. सोमवारी सोने प्रति तोळा 28,450 रुपये इतका भाव होता.

औद्योगिक युनिट आणि नाणे  बाजारात सोनेची मागणी कमी झाली होती. तर चांदीमध्ये 400 रुपयांनी घट होऊन चांदीचा किलोला दर 45600 रुपये इतका होता. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चार महिन्यातील अंच्चांकावरून खाली आले आहे. याचा परिणाम सोने किंमतीवर दिसून येत आहे. सिंगापूरमध्ये सोने किंमतीत 1.6 टक्केने घट झाली. 1317.12 आणि चांदीचा भाव 1.6 टक्के घसरून 21.09 डॉलर प्रति औंस राहला.

दिल्लीत सोने 99.9 आणि शुद्ध सोनेचा 99.5 भाव होता. 280 रुपयांची घर सोने बाजारात दिसून आली. दिल्लीत सोने 28250 ते 28450 दरम्यान प्रती तोळा दर होता. तर चांदीमध्ये 400 रुपयांनी घसरण दिसून आली. चांदी 45600 प्रति किलो दर होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.