SBI ची भन्नाट योजना: एकदाच डिपॉझिट करा पैसे, प्रत्येक महिन्याला होईल कमाई, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SBI Superhit Scheme: एसबीआय बँकेने ग्राहकांसाठी एक सुपरहिट स्कीम आणली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 30, 2024, 09:55 AM IST
SBI ची भन्नाट योजना: एकदाच डिपॉझिट करा पैसे, प्रत्येक महिन्याला होईल कमाई, जाणून घ्या संपूर्ण माहिती   title=
SBI Superhit Scheme All you need to know about SBI Annuity deposit scheme

SBI Annuity Deposit Scheme: देशातील सर्वात मोठी बँक म्हणजेच एसबीआय (SBI)ने ग्राहकांसाठी टर्म डिपॉझिटव्यतिरिक्त अनेक स्पेशल डिपॉझिट योजनांमध्येही गुंतवणूक करुन व्याज कमावण्याची संधी देते. यातील एक स्कीम म्हणजे SBI एन्युटी डिपॉझिट (SBI annuity deposit scheme) ही आहे. या स्कीमची वैशिष्ट्ये म्हणजे यात तुम्हाला एकरकमी पैसे डिपॉझिट करावे लागतात. त्यानंतर तुम्हाला दरमहा व्याजासह उत्पन्न मिळेल. 

SBI annuity deposit schemeमध्ये ग्राहकाला दर महिन्याला मुळ रकमेसह व्याज दिले जाते. खात्यात शिल्लक असलेल्या रकमेवर प्रत्येत तिमाहित चक्रवाढ करुन हे व्याज मोजले जाते. एसबीआयच्या वेबसाईटनुसार, बँकेच्या मुदत ठेवींवर म्हणजेच एफडीवर जे व्याज मिळते तेच व्याज डिपॉझिटवरही मिळते. 

SBI Scheme: किती वेळासाठी डिपॉझिट मिळू शकते

SBIच्या वेबसाइटनुसार, या योजनेत एखाद्या ग्राहकाने गुंतवणुकीसाठी एकरकमी पैसे डिपॉझिट करायचे आहे आणि त्यानंतर त्यांना महिन्याला एक ठराविक रक्कम म्हणजेच प्रिंसिपल अमाउंट आणि व्याज मिळते. या स्कीममध्ये 36,60, 84 आणि 120 महिन्यांसाठी एकरकमी पैसे तुम्ही जमा करु शकता. यामध्ये कमाल ठेवींवर मर्यादा नाही. तर, किमान 1000 प्रति महिना भरावे लागणार. ही योजना SBI च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे.

एसबीआयची ही योजना ठेवीनंतर पुढील महिन्याच्या नियोजित तारखेपासून व्याज देण्यात येईल.  जर एखाद्या महिन्यात ती तारीख नसेल (29, 30 आणि 31), तर व्याज पुढील महिन्याच्या 1 तारखेला प्राप्त होईल. TDS कापल्यानंतर ॲन्युइटी पेमेंट लिंक केलेल्या बचत खात्यात किंवा चालू खात्यात जमा केले जाईल. SBI Annuity Deposit Scheme मध्ये नियमित ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना टर्म डिपॉझिटवर मिळणारे व्याज मिळते. यात नॉमिनेशनची सुविधादेखील उपलब्ध आहे. ग्राहकांना एक पासबुकदेखील दिले जाईल. यात एका शाखेतून दुसऱ्या शाखेत तुम्ही ट्रान्सफरदेखील करु शकता. 

SBI Annuity Deposit Scheme मध्ये गरज पडल्यास एन्यूटीच्या बचत रकमेतून 75 टक्क्यांपर्यंतच्या रकमेचे ओव्हरड्राफ्ट किंवा कर्ज मिळू शकते. मात्र, लोन किंवा ओव्हरड्राफ्ट घेतल्यानंतर एन्यूटी लोन अकाउंटमध्ये क्रेडिट होईल. तसंच, खातेदारकाचा मृत्यू झाल्यास वेळेच्या आधीच योजना बंद करता येते. त्याचबरोबर 15 लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉझिटसाठी प्री-पेमेंटदेखील केलं जाऊ शकते. प्री-मॅच्युअर पेनल्टी देखील एफडीवर आकारल्या जाणाऱ्या दराने भरावी लागेल. म्हणजेच मुदत ठेवींनुसार या योजनेत प्री-मॅच्युअर पेनल्टी लागू आहे. भारतातील रहिवाशी हे खाते सुरू करु शकतात. तसंच, अल्पवयीन मुलंदेखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सिंगल व जॉइंट पद्धतीनेही हे अकाउंट उघडता येते.