अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावावरून शह काटशाहचं राजकारण

अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावावरून आता राज्यात जोरदार शह काटशाहचं राजकारण सुरु झालंय. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ मंत्र्यांनी आज दुपारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावाला भाजपला कोंडीत पकडण्यासाठी आता काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची एकत्र बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे नेते राधाकृष्णविखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, उपस्थित होते.

Updated: Aug 2, 2016, 04:22 PM IST
अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावावरून शह काटशाहचं राजकारण title=

मुंबई : अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावावरून आता राज्यात जोरदार शह काटशाहचं राजकारण सुरु झालंय. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ मंत्र्यांनी आज दुपारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावाला भाजपला कोंडीत पकडण्यासाठी आता काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची एकत्र बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे नेते राधाकृष्णविखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, उपस्थित होते.

रामदास कदमांच्या दालनात ही बैठक झाली. तिकडे विधानपरिषदेत धनंजय मुडेंनी मुख्यमंत्र्यांनी स्वतः अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव मांडल्याशिवाय सभागृह चालूच देणार नाही असा इशारा दिला आहे. दोन्ही सभागृहात आज सलग तिसऱ्या दिवशी अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू झाला आहे. विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली आहे.